भुसावळ तालुक्यातील 15 हजार बालकांना दिला जाणार पोलिओचा डोस

0

मोहिम यशस्वी करण्यासाठी 15 जानेवारीपर्यंत आरोग्य विभागाकडून विशेष जनजागृती मोहिम

भुसावळ– राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेंतर्गत 28 जानेवारीला पहिल्या टप्प्यात तालुक्यातील 14 हजार 833 बालकांना पोलिओचा पहिला डोस दिला जाणार आहे. यासाठी तालुका आरोग्य विभागाकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे. मोहिम यशस्वी करण्यासाठी 15 जानेवारीपर्यंत आरोग्य विभागाकडून विशेष जनजागृती मोहिम राबविण्यात येत असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकार्‍यांनी दिली.

पोलिओ लाभार्थींची संख्या
किन्ही प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत तीन हजार 973 पोलिओ डोसचे अपेक्षित लाभार्थी आहेत तर पिंपळगाव बुद्रूक अंतर्गत दोन हजार 295, वराडसीम दोन हजार 285, कठोरा बुद्रूक पाच हजार 280 पोलिओचे लाभार्थी आहेत. या चारही केंद्रांतर्गत 85 बुथ लावण्यात येणार आहेत. यासाठी आरोग्यविभागाकडून 102 पथके तयार करण्यात आली असून त्यांना आरोग्य विभागातर्फे सूचना करण्यात आल्या आहेत. मोहिमेत ज्या बालकांनी लस घेतली नाहीत, अशा बालकांचा घरोघरी जावून सर्वे करून त्यांना लसदेखील देण्यात येणार आहे.