भुसावळ तालुक्यातून पुन्हा एकाची हद्दपारी
प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांचे आदेश : दोन टोळ्यांच्या हद्दपारीनंतर तिसरी कारवाई
भुसावळ : शहरातून दोन टोळ्या हद्दपार करण्यात आल्याचे प्रकरण ताजे असतानाच बुधवारी पुन्हा वराडसीम येथील एकास जळगाव जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याबाबत प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांनी आदेश काढल्याने शहरात खळबळ उडाली आहे. सचिन संतोष सपकाळे (वराडसीम) असे हद्दपार करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे.
जानेवारीत सादर झाला होता प्रस्ताव
सचिन संतोष सपकाळे यांच्या हद्दपारीबाबत 4 जानेवारी 2021 या दिवशी प्रांताधिकारी कार्यालयात प्रस्ताव दाखल करण्यात आला. प्रांताधिकारी सुलाणे यांनी पोलिस व संबंधिताचे म्हणणे ऐकून घेत दोन वर्षांसाठी सपकाळे यांना हद्दपार करण्याचा आदेश काढले. दरम्यान, मंगळवारीच शहरातील रीपाइंचे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांच्यासह आठ जणांना जिल्हा पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार केल्याचे प्रकरण ताजे असतानाच हद्दपारीचा आदेश निघाल्याने खळबळ उडाली आहे. शहरासह ग्रामीण भागातील उपद्रवींच्या हद्दपारीचे आदेशही लवकरच निघण्याची दाट शक्यता आहे.