भुसावळ तालुक्यात केळीवर करपा, लाखोंचे नुकसान

0

भुसावळ । तालुक्यात साकरीसह जाडगाव, मन्यारखेडा, वरणगाव, कठोरा, हतनूर, खडका परीसरात केळी बागा करप्यामुळे उद्ध्वस्त होत असल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत आहे. शासनाने केळी करप्यासाठी अनुदानावर औषधी उपलब्ध करून द्यावी तसेच पंचनामा करून भरपाई द्यावी, अशी मागणी या परीसरातील शेतकर्‍यांकडून होत आहे. नारायण पाचपांडे, शांताराम सरोदे तसेच किरण चोपडे यांच्यासह अनेक शेतकर्‍यांच्या शेतातील केळीवर करपा रोगाची लागण झाल्याने लाखो रुपयांचा फटका बसला आहे. प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी, अशी अपेक्षा आहे.