भुसावळ तालुक्यात चोरवड ग्रामपंचायतीसाठी सर्वाधिक 72 टक्के मतदान

0
निंभोर्‍यात मात्र दुपारपर्यंत अवघे 40 टक्के मतदान
भुसावळ- चार ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक तर एका ग्रामपंचायतीसाठी पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी मतदान प्रक्रिया राबवली जात आहे. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत चोरवड-खेडी ग्रामपंचायतीसाठी सर्वाधिक 72  टक्के मतदान झाले असून त्यानंतर गोजोरा 60, वराडसीम 54 तर सुनसगाव-गोंभीसाठी 52 टक्के मतदान झाल्याची माहिती प्रभारी तहसीलदार संजय तायडे यांनी दिली. निंभोरा-पिंप्रीसेकम ग्रामपंचायतीसाठी पोटनिवडणूक होत असलीतरी येथे सर्वाधिक कमी म्हणजे 40 टक्के मतदान झाले.
निंभोरा प्रकरणी दाखल होणार गुन्हा
मतदारांना प्रलोभन दाखवत पैसे वाटप करीत असल्याच्या संशयातून निंभोरा येथे वाद उद्भवून रामचंद्र तायडे यांना जमावाने बेदम मारहाण केल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली होती तर सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी वेळीच सतर्कता दाखवल्याने वाद मिटला होता तर याप्रकरणी एकूण आठ ते दहा जणांना तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.