भुसावळ- जिल्हा परीषद सदस्य रवींद्र नाना पाटील यांच्या प्रयत्नातून जिल्हा परीषदेच्या विविध योजनेंतर्गत सुमारे 60 लाख रुपये खर्चाच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले. त्यात जोगलखेडा ते भानखेडा रस्ता डांबरीकरणासह भानखेडा येथे पाईप मोरी व किन्ही-विचवा रस्ता डांबरीकरणासह साकेगावात पेव्हर ब्लॉक बसविणे कामाचा समावेश आहे.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष तथा जिल्हा परीषद सदस्य रवींद्र नाना पाटील, बाजार समिती सभापती सचिन संतोष चौधरी, वरणगाव नगरपालिकेचे गटनेते राजेंद्र विश्वनाथ चौधरी, शहराध्यक्ष नितीन धांडे ,युवक तालुकाध्यक्ष नीळकंठ चौधरी, नगरसेवक समाधान चौधरी, युवक जिल्हा सचिव मंगेश पाटील, संभाजी ब्रिगेडचे रावेर लोकसभा प्रमुख प्रमोद पाटील, जोगलखेडा-भानखेडा सरपंच पंकज पाटील, उपसरपंच रामशिंग मोरे, ग्रामपंचायत सदस्य जानकीराम कोळी, रेखाबाई सोनवणे, लिलाधर पाटील, पोलिस पाटील शरद पाटील, सुरेश पाटील, महेंद्र पाटील, राजेंद्र पाटील, मंगल सोनवणे, लाला सोनवणे, सोपान पाटील, प्रवीण पाटील, ग्रामसेवक प्रतिभा तायडे आदींची उपस्थिती होती.