भुसावळ ते इगतपुरी मेमू नाशिकपर्यंतच धावणार

भुसावळ : प्रवास वेगवान व सुखकर होण्यासाठी रेल्वे प्रशासनाने पॅसेंजरऐवजी मेमू गाडी सुरू केली. मात्र, भुसावळ-इगतपुरी या मेमू गाडीला सुरूवातीपासून अडथळे येत आहे. आता ही गाडी 1 जूनपर्यंत पाच दिवसांसाठी नाशिकपर्यंत शॉर्ट टर्मिनेट केली आहे.

प्रवाशांची होणार गैरसोय
गाडी क्रमांक 11120 भुसावळ-इगतपुरी मेमू ही 28 मे ते 1 जूनपर्यंत शॉर्ट टर्मिनेट केली आहे. तर गाडी क्रमांक 11119 इगतपुरी-भुसावळ मेमू 28 मे पासून 1 जूनपर्यंत इगतपुरीहून न सुटता नाशिकहून सुटणार आहे. त्यामुळे नाशिकहून इगतपुरी व तेथून पुढे मुंबईकडे जाणार्‍या व मुंबई व इगतपुरीहून नाशिक, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळात येणार्‍या प्रवाशांचे हाल होत आहेत.