भुसावळ ते शेगाव पदयात्रा पालखी सोहळ्याचे आयोजन

0

भुसावळ : श्री संत सेवा समुहातर्फें भुसावळ ते श्रीक्षेत्र शेगाव पदयात्रा पालखी सोहळ्याचे 25 रोजी आयोजन करण्यात आले आहे. ही पालखी पहाटे 5 वाजता नाहाटा महाविद्यालय चौफुली येथील खंडोबा मंदिरापासून शेगावच्या दिशेने प्रस्थान करेल. दरम्यानच्या प्रवासात 25 रोजी मुक्ताई संस्थान येथे मुक्काम, 26 रोजी मलकापूूर, 27 रोजी नांदुरा येथे मुक्काम करुन 28 रोजी शेगाव येथे संत गजानन महाराजांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले जाईल. या पदयात्रेत दररोज रात्री 8 वाजता महामंडलेश्‍वर जनार्दन महाराजांचे कीर्तन होईल. तसेच हभप कृष्णकांत येरंम ठाणे, योगाचार्य सतिश भोरटक्के, शहनाईवादक अरुण गुरव, हभप राजू मोरे, सोपान मोरे, सिंधू मोरे, शकुंतला मोरे, राजेश गिरणारे यांची साथसंगत लाभणार आहे. तरी भाविकांनी पालखी पदयात्रेत सहभागी होेण्याचे आवाहन वीरभान पाटील, सुरेश सोनवणे, सुनिता सुर्यवंशी, संदिप पाठक, अ‍ॅड. योगेेश दलाल, मयुरेश जोशी यांनी केले आहे.