भुसावळ- नगरपालिकेची सर्वसाधारण सभा मंगळवार, 30 ासेजी सकाळी 11 वाजता पालिकेच्या सभागृहात होणार आहे. या सभेच्या अंजेड्यावर 35 विषय ठेवण्यात आले आहेत. शहरातील गटारी, ढापे, बांधकाम आदींशी निगडीत असलेल्या या विषयांना सभेत मंजूरी मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, जनआधारच्या गटनेत्यांसह चौघे अपात्र झाल्यानंतर आगामी सभेत अन्य जनआधारच्या नगरसेवकांची काय भूमिका असेल? याकडे लक्ष लागले आहे. या सभेत शहरातील विविध भागांमध्ये रिटेनींग वॉल बांधकाम करणे, आर. सी. सी. गटारींचे बांधकाम करणे, नगरपालिका शाळा क्रमांक 35 मधील आवारात दोन शाळा खोल्यांचे बांधकाम करणे, शहरातील तुकाराम नगर, दुर्गा कॉलनी भागात रस्त्यांचे मजबूतीकरण व डज्ञंबरीकरण करण्याच्या कामावार आलेल्या खर्च अंदाजाला मंजूरी देणे, शहरातील आगामी काळात निर्माण होऊ पाहणार्या पाणी टंचाईच्या पार्श्वभुमीवर वाढीव पाणीपुरवठा मिळावा यासाठी तापीपात्रातील बंधार्याच्या कामाबाबत विचार करणे आदी विषयांवर चर्चा होणार आहे. निविदांना मंजूरी, खर्चअंदाजाला मंजूरी, आरसीसी गटारी आदी कामांना मंजूरी मिळाल्यास शहरातील विकासकामांना गती मिळणार आहे.