भुसावळ-नरखेड पॅसेंजर चार दिवसांसाठी रद्द

0

रेल्वेतर्फे होणार तांत्रिक कामे ; गैरसोयींबाबत दखल घेण्याचे आवाहन

भुसावळ- मध्य रेल्वेच्या भुसावळ विभाग अंर्तगत सुरू असलेली अप-डाऊन भुसावळ-नरखेड पॅसेंजर गाडी व नरखेड-भुसावळ पॅसेंजर गाडी काही तांत्रिक कारणामुळे ती दिवसांसाठी रद्द करण्यात आली आहे. गाडी क्रमांक 51183 डाऊन भुसावळ-नरखेड पॅसेंजर व 51152 अप नरखेड-भुसावळ पॅसेंजर 28 ऑक्टोबर तसेच 4, 11 व 18 नोव्हेंबरसाठी रद्द करण्यात आली आहे. रेल्वे प्रवाशांनी याबाबत दखल घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.