भुसावळ-नागपूर पॅसेंजर 25 दिवस रद्द

0

प्रवांशासह चाकरमान्यांचे होणार हाल : नागपूर विभागात प्लॅटफार्मची उभारणी

भुसावळ : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात प्लॅटफार्म क्रमांक एक व दोनच्या उभारणीसाठी अप-डाऊन नागपूर पॅसेंजर 9 जानेवारी ते 2 फेबु्रवारीदरम्यान रद्द करण्याचा रेल्वे प्रशासनाने निर्णय घेतला आहे. दरम्यान, या निर्णयामुळे चाकरमान्यांसह रेल्वे प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. अप 51286 नागपुर-भुसावळ व डाऊन 51285 भुसावळ-नागपूर पॅसेंजर 9 जानेवारी ते 2 फेबु्रवारी दरम्यान रद्द करण्यात आली आहे.

वर्धा पॅसेंजरही काही दिवस रद्द
अप 51262 वर्धा-अमरावती पॅसेंजर 11 व 12, 18 व 19, 20, 25, 26 जानेवारी व 1 व 2 फेब्रुवारी रोजी रद्द करण्यात येणार आहे तर डाऊन 51261 अमरावती-वर्धा पॅसेंजर 11, 12, 18 व 19, 25, 26, 2 फेब्रुवारी रोजी रद्द करण्यात आली आहे. दरम्यान गाडी क्रमांक 12290 अप नागपुर-मुंबई दुरांतो 9 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान नागपूर ऐवजी अजनी स्थानकावरून सुटेल तर डाऊन 12289 मुंबई-नागपुर दुरांतो 9 जानेवारी ते 1 फेब्रुवारी दरम्यान अजनी रेल्वे स्थानकावर शॉर्ट टर्मिनेट करण्यात आली आहे.