भुसावळ नाहाटा महाविद्यालय माजी विद्यार्थी संघटना आणि आय सी ए आय दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “वर्कशॉप ऑन करियर इन सीए चे आयोजन”

भुसावळ शहर आणि परिसरातील सीए होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नाहाटा महाविद्यालयात द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया दिल्ली (आयसीएआय) आयोजित “वर्कशॉप ऑन करिअर इन सीए”चे आयोजन दिनांक 6 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी10.30 वा. वाचनकक्षात केलेले आहे.यात मा.श्री.मुकेशजी अग्रवाल(सीए भुसावळ) आणि मा.श्री.विनोदजी जाधव (आय सी ए आय प्रतिनिधी, दिल्ली)यांचे बहुमूल्य असे मार्गदर्शन होणार आहे, यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ मोहन फालक हे तर प्रमुख उपस्थिती महेश फालक चेअरमन ताप्ती एज्युकेशन सोसायटी,विष्णू चौधरी सचिव ताप्ती एज्युकेशन सोसायटी, संजय कुमारजी नाहाटा कोषाध्यक्ष ताप्ती एज्युकेशन सोसायटी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस व्ही पाटील,उपप्राचार्य डॉ.बी एच बऱ्हाटे, उपप्राचार्य डॉ.ए डी गोस्वामी, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. वाय एम पाटील, पर्यवेक्षिका श्रीमती प्रा.स्वाती चौधरी यांची लाभणार आहे. या कार्यशाळेमध्ये सीए होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सीए करताना कुठल्या कुठल्या परीक्षांना सामोरे जावे, कोणकोणत्या गोष्टी कराव्यात,अभ्यास करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.सीए होऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ही कार्यशाळा अत्यंत उपयोगाची असल्याने उज्वल भविष्य घडवण्याची इच्छा असलेल्या भुसावळ शहर आणि परिसरातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे आवाहन नाहाटा महाविद्यालयातील माजी विद्यार्थी संघटनेतर्फे करण्यात येत आहे.अधिक माहीतीसाठी प्रा.डॉ.जी आर वाणी सचिव माजी विद्यार्थी संघटना मो.न -9226826992,7588580877