भुसावळ नाहाटा महाविद्यालय माजी विद्यार्थी संघटना आणि आय सी ए आय दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने “वर्कशॉप ऑन करियर इन सीए कार्यशाळा संपन्न

भुसावळ-येथील नाहाटा महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटना आणि द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया दिल्ली (आयसीएआय) आयोजित “वर्कशॉप ऑन करिअर इन सीए”कार्यशाळा संपन्न झाली या कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शक मा.श्री.मुकेशजी अग्रवाल(सीए भुसावळ) आणि मा.श्री.विनोदजी जाधव (आय सी ए आय प्रतिनिधी, दिल्ली) श्री धर्मेंद्रजी मेंडकी हे तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ मोहन फालक, प्रमुख उपस्थिती संजयकुमारजी नाहाटा कोषाध्यक्ष ताप्ती एज्युकेशन सोसायटी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस व्ही पाटील,उपप्राचार्य डॉ.बी एच बऱ्हाटे, उपप्राचार्य डॉ.ए डी गोस्वामी, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.वाय एम पाटील, पर्यवेक्षिका श्रीमती प्रा.स्वाती पाटील,माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष प्रा.प्रशांत पाटील,सचिव डॉ.जी आर.वाणी, कोषाध्यक्ष प्रा. हर्षल पाटील यांची होती.या कार्यशाळेमध्ये सीए होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी श्री.मुकेशजी अग्रवाल यांनी सीए करताना कुठल्या कुठल्या परीक्षांना सामोरे जावे, कोणकोणत्या गोष्टी कराव्यात,अभ्यास करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, सीए हा अभ्यासक्रम काय असतो, त्यासाठी कोणकोणती संदर्भ पुस्तके वाचावे, फाउंडेशन कोर्स काय असतो तसेच सीए फायनल कोर्स काय असतो.

इंटरमीडिएट कोर्स काय असतो,त्या कोर्सचा अभ्यास कसा करायचा त्या कोर्सला नोंदणी कशी करायची सीए परीक्षा कशी द्यायची.त्या परीक्षेची प्रणाली काय असते असे मार्मिक असे मार्गदर्शन केले याशिवाय त्यांनी विद्यार्थ्यांना सीए परीक्षा पास होण्यासाठी चा एक मंत्र दिला तो म्हणजे कठीण परिश्रम अधिक योगदान म्हणजेच सीए असे त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच सीए झाल्यानंतर कोणकोणत्या विषयात त्यांना संधी उपलब्ध आहे. सीए होत असताना समाजात किती महत्त्व प्राप्त होत असते सीए झाल्यानंतर मुलांना किती महत्त्व असते या संबंध गोष्टीचे मार्गदर्शन त्यांनी केले.याप्रसंगी श्री.विनोदजी जाधव आणि श्री धर्मेंद्रजी मेंडकी यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.मोहनभाऊ फालक यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की आज समाजाची गरज हे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सीए व्हायची आहे मुलांनी सीएच्या अभ्यासक्रमाकडे अतिशय महत्त्वपूर्ण रीतीने बघायला पाहिजे. आज आपल्याला सीए लोकांचा तुटवडा दिसतो आहे तो निघायला पाहिजे असे सांगितले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.स्मिता बेंडाळे आणि प्रा.सपना कोल्हे यांनी केले तर ऋणनिर्देशक प्रा. डॉ.गौरी पाटील तर प्रास्ताविक डॉ.जी आर वाणी यांनी केले या कार्यक्रमासाठी प्रा.डॉ.चंद्रकांत सरोदे प्रा.दीपक पाटील प्रा.स्वाती शेळके,प्रा.डॉ. ममता पाटील, प्रा.ललित टाक,प्रा.डॉ.रश्मी शर्मा,प्रा.खिलेश पाटील,प्रा.भूषण चौधरी,प्रा.आकाश तायडे यांनी परिश्रम घेतले