भुसावळ नाहाटा महाविद्यालयात रसायनशास्त्र विभागातर्फे (CPCS-2023) राष्ट्रीय परिषद संपन्न
परिषदेत 239 संशोधकांचा सहभाग
भुसावळ :- येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागातर्फे चौथ्या एक दिवसीय ‘रसायनशास्त्रातील बदलते परिमाणे’ (CPCS-2023) या विषयावर राष्ट्रीय परिषद संपन्न झाली. सदरच्या परिषदेचे उद्घाटन महाविद्यालयातील परिषद हॉल A-59 मध्ये माननीय डॉ. व्ही. गणेशन (माजी संचालक UGC DAE Indore) यांच्या हस्ते संपन्न झाले. या उद्घाटनाला विशेष उपस्थिती डॉ. मिलिंद देशमुख (विशेष प्रोफेसर सागर विद्यापीठ, सागर) यांची लाभली. ही संपूर्ण परिषद मा. विष्णूभाऊ चौधरी (सेक्रेटरी, ताप्ती एज्युकेशन सोसायटी भुसावळ) यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. तर या उद्घाटन समारंभास डॉ. मोहनभाऊ फालक (अध्यक्ष ताप्ती एज्युकेशन सोसायटी भुसावळ) ,मा. महेशभाऊ फालक (चेअरमन, ताप्ती एज्युकेशन सोसायटी भुसावळ), मा. संजयकुमारजी नाहाटा (कोषाध्यक्ष, ताप्ती एज्युकेशन सोसायटी भुसावळ), प्राचार्य डॉ.एस. व्ही. पाटील, उपप्राचार्य डॉ. बी. एच. बऱ्हाटे, उपप्राचार्य डॉ. ए. डी. गोस्वामी, प्रा. ई. जी. नेहेते , कनिष्ठ महाविद्यालय उपप्राचार्य. प्रा. वाय. एम. पाटील , प्रा. जी. एस. सोनवणे, प्रा. ए. एम. नेमाडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या परिषदेत पहिल्या सत्रात माननीय डॉ. व्ही. गणेशन यांनी यांनी सांगितले कि रसायनशास्त्रामध्ये आधुनिक युगात वेगवेगळे मतप्रवाह निर्माण होत आहे या मतप्रवाहाचा अभ्यास करतांना भौतिक रसायशास्त्राचा आधार घेवून वेगवेगळे मटेरियल आधुनिक गुणधर्म तपासले जाऊ शकतात तसेच भौतिक रसायनशास्त्र अभ्यास करतांना अतिशय किचकट आहे असे म्हणतात परंतु आधुनिकतेची जोड देवून जर आपण या भौतिक रसायनशास्त्राचा अभ्यास केला तर रसायनशास्त्राच्या शाखांमध्ये सर्वात सोपे शास्त्र हे भौतिक रसायनशास्त्र आहे असे मार्गदर्शन केले.
दुसऱ्या सत्रात डॉ. मिलिंद देशमुख यांनी मोलेक्युलर क्लस्टर मधील हायड्रोजन बंध याची ऊर्जा काढण्यासाठी कॉउंटम प्रणालीचा उपयोग करून एक सिद्धांत मांडला आणि त्या सिद्धांताचा उपयोग करून मोलेक्युलर क्लस्टर मधील हायड्रोजन बंधाच्या ऊर्जेची माहिती उपस्थित संशोधकांना दिली.
परिषदेसाठी उपस्थित संशोधक व विद्यार्थी यांनी रसायनशास्त्रातील सिद्धांतीक व गणकीय रसायनशास्त्र, रासायनिक अभिक्रिया, जैविक उत्पादकता, हरित रसायनशास्त्र, पर्यावरण रसायनशास्त्र, पॉलीमर रसायनशास्त्र इ. रसायनशास्त्रातील विविध उपविषयांचा पॉवरपॉइन्ट प्रेझेन्टेशन, पोस्टर प्रेझेन्टेशन 45 संशोधकांनी केले. या परिषदेसाठी पुणे, मुंबई, गुजरात, कानपूर, जयपुर, सागर या बरोबरच महाराष्ट्रातील इतर विद्यापीठांतील 239 संशोधक व विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला.
परिषदेच्या समारोपास समारोपकर्ते म्हणून जी. जी. खडसे महाविद्यालय मुक्ताईनगरचे प्राचार्य डॉ. एच. ए. महाजन तर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. व्ही. पाटील हे होते.
आपल्या समारोपपर भाषणात डॉ. महाजन यांनी सांगितले कि आपल्या मधील असलेल्या विज्ञान विषयातील वैशिष्ट्यपूर्ण कामाची नवीन पिढीतील संशोधकांमध्ये जाणीव वृद्धिंगत व्हावी आणि हि जाणीव व्हायची असेल तर अशा परिषदांचे आयोजन केल्याने होऊ शकते आणि नाहाटा महाविद्यालयातील CPCS 2023 या चौथ्या परिषदेमुळे संशोधक किंवा विद्यार्थ्यांचा उद्देश सफल होईल याची मला खात्री आहे.
या परिषदेसाठी रसायनशास्त्र विभागप्रमुख परिषदेचे चेअरमन डॉ. सचिन येवले , समन्वयक डॉ. उमेश फेगडे, परिषदेचे सचिव डॉ. चंद्रकांत सरोदे, प्रा. संगीता भिरूड, परिषदेचे कोषाअध्यक्ष डॉ. विलास महिरे, प्रा. नीलिमा पाटील, प्रा. सौ. तेजश्री झोपे ,डॉ. सचिन कोलते, डॉ. अजय क्षिरसागर, प्रा. धनश्री बरडे, प्रा. शंकर पाटील, प्रा. सागर सोनवणे, प्रा. डॉ. जी. आर. वाणी, प्रा. दीपक पाटील, प्रा. प्रशांत पाटील तसेच रसायनशास्त्र विभागातील शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. असे परिषद प्रसिद्धी समिती प्रमुख प्रा. प्रशांत पाटील यांनी कळविले आहे.
महाशय
दैनिक
आपल्या सुप्रसिद्ध दैनिकात आमची बातमी देवून आम्हास उपकृत करावे हि नम्र विनंती