भुसावळ- भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयाच्या परीसरात थुंकल्याप्रकरणी कंडारीच्या सदाशीव रामसुमेर कोरी यांना न्या.मानकर यांनी एक हजार दोनशे रुपये दंड सुनावला व दंड न भरल्यास आठ दिवस साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. कोरी यांनी 10 डिसेंबर 2015 रोजी न्यायालयाच्या आवारात थुंकल्याने त्यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. सार्वजनिक ठिकाणी लावलेल्या सूचनांचे पालन न करता न्यायालय परीसरात थुंकल्याचे सिद्ध झाल्याने कोरी यांना सोमवारी एक हजार दोनशे रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. सरकारतर्फे अॅड.गवई यांनी युक्तीवाद केला. शहर पोलिस ठाण्यातर्फे पैरवी अधिकारी म्हणून सहाय्यक फौजदार आसीफ खान यांनी काम पाहिले.