जिल्हा परीषद मुख्य कार्यकारी अधिकार्यांची अचानक धावती भेट
भुसावळ- जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ बी.एन.पाटील यांनी बुधवारी भुसावळ पंचायत समितीच्या आरोग्य विभागात भेट दिल्यानंतर तीन कर्मचारी अनुपस्थित आढळून आल्याने तिघांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याने दांडी बहाद्दरांमध्ये खळबळ उडाली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन.पाटील हे बुधवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास भुसावळात पंचायत समितीच्या कार्यालयात आले असता लेखापाल वैशाली वाणी, आर.जी.सोनवणे, ज्योती जगताप हे तीन कर्मचारी गैरहजर आढळल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस तातडीने बजावण्यात आली.