भुसावळ- पंचायत समितीचे उपसभापती वंदना उन्हाळे यांची ठरल्याप्रमाणे बिनविरोध निवड करण्यात आली. बुधवारी पंचायत समिती सभागृहात निवड प्रक्रिया राबविण्यात आली. पीठासीन अधिकारी म्हणून प्रभारी तहसीलदार संजय तायडे होते. यावेळी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. उपसभापती पदासाठी एकमेव उन्हाळे यांचा अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. गत शुक्रवारी सभापतीपदावर प्रीती पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. प्रसंगी गटविकास अधिकारी सुभाष मावळे प्रीती पाटील, मनीषा पाटील, सुनील महाजन आदी उपस्थित होते. त्यांनी उन्हाळे यांच्या निवडीनंतर त्यांचा सत्कार केला.