भुसावळ पंचायत समिती सभापतीपदी मनीषा पाटील

0

भुसावळ : भुसावळ पंचायत समितीच्या सभापती पदावर मनीषा भालचंद्र पाटील तर उपसभापती पदावर वंदना उन्हाळे यांची वर्णी लागली. पंचायत समितीच्या सभागृहात विशेष सभेला पीठासन अधिकारी म्हणून तहसीलदार दीपक ढीवरे उपस्थित होते. त्यांना सहाय्यक गटविकास अधिकारी विलास भाटकर , तहसील कार्यालयातील निवडणूक शाखेचे भगवान शिरसाट यांनी सहकार्य केले.
सेना व राष्ट्रवादी सदस्यांनी सभेकडे फिरवली पाठ
भुसावळ पंचायत समितीवर भाजपाचे वर्चस्व असून सहा सदस्य असलेल्या या पंचायत समितीमध्ये चार भाजपा, एक राष्ट्रवादी व एक शिवसेना असे संख्याबळ आहे. या विशेष सभेला भाजपाच्या नवनिर्वाचित सभापती मनीषा पाटील, उपसभाापती वंदना उन्हाळे, सुनील महाजन, प्रीती पाटील आदी सदस्य उपस्थित होते. शिवसेना सदस्य विजय भास्कर सुरवााडे, राष्ट्रवादी आशा संतोष निंबाळकर हे दोन सदस्य अनुपस्थित होते. दरम्यान, सभापती , उपसभापती या निवडीनंतर आमदार संजय सावकारे यांनी विजयी उमेदवारांचा सत्कार केला. यावेळी जिल्हा परिषद माजी सदस्य राजेंद्र चौधरी, समाधान पवार, सदानंद उन्हाळे, नगरसेवक प्रमोद नेमाडे आदी उपस्थित होते.