भुसावळ- पालिकेच्या उपनगराध्यक्षा लक्ष्मी मकासरे यांनी ठरल्याप्रमाणे पदाचा राजीनामा दिल्याने रीक्त पदासाठी 2 एप्रिल रोजी पालिका सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी 12 वाजता निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यंदा या पदासाठी शेख सईदा शफी यांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. पालिकेत भाजपाची सत्ता असल्याने अंतिम निर्णय माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे हेच घेणार असलेतरी सामाजिक समीकरणांचे बेरीज पाहता सईदा शफी यांना संधी मिळेल, असी राजकीय सूत्रांकडून समजते.