भुसावळ पालिका बंब प्रकरण ; सातही आरोपींना एका दिवसाची पोलिस कोठडी

0

भुसावळ- वाढदिवसाची पार्टी आटोपून आलेल्या तरुणांच्या टोळक्याने गोपाळ नगरातील पालिकेच्या कार्यालय आवारातील पालिकेचा अग्नीशमन बंब पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याची घटना तसेच वाहनाच्या काचा फोडण्यात आल्याची घटना बुधवारी, 24 एप्रिल रोजी मध्यरात्री घडली होती. या प्रकरणातील नऊ पैकी सात संशयितांना अटक करण्यात आली होती. या आरोपींची शुक्रवारी ओळख परेड झाल्यानंतर शनिवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. कोठडीदरम्यान दोन संशयीत आरोपींचा ठावठिकाणा तसेच चोरीला गेलेल्या पितळी नोझेतबाबत पोलिसांकडून चौकशी केली जाणार आहे.

सातही आरोपींना पोलिस कोठडी
शुक्रवारी सकाळी भुसावळातील दुय्यम कारागृहात असलेल्या संशयीत आरोपी गौरव बढे, विशाल दिलीप सूर्यवंशी (रा. कोळीवाडा, भुसावळ) व चेतन उर्फ गोलू दिलीप रडे (रा.जुना सातारा, भुसावळ), सचिन अरविंद भालेराव (18, श्रीनगर, भुसावळ), भावेश कांतीलाल दंडगव्हाळ (23, शिव कॉलनी, भुसावळ) व सचिन मनोहर कोळी (24, सूर्यवंशी, श्रीनगर, भुसावळ), जितू शरद भालेराव (24, टेक्नीकल हायस्कूलमागे, भुसावळ) यांची नायब तहसीलदारांसमक्ष ओळख परेड घेण्यात आल्यानंतर तक्रारदार तसेच साक्षीदार यांनी सातही आरोपींना ओळखले होते तर शनिवारी या आरोपींना शहर पोलिसांना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तपास शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मो.वली सैय्यद करीत आहेत.