भारीप बहुजन महासंघाची प्रांताधिकारी प्रशासनाकडे तक्रार
भुसावळ : रेल्वेच्या माहेरघरातील पालिकेचा दवाखाना नुसताच नावाला असून येथे रात्रीबेरात्री डॉक्टर नसल्याने रुग्णांवर उपचार करणे कठीण झाले आहे. गोरगरीब रुग्णांवर उपचार व्हावे यासाठी हा दवाखाना असला तरी येथे आल्यानंतर औषधे बाहेरून आणण्याचा सल्ला दिला जात असल्याने हा दवाखाना नव्हे तर ‘भूतखाना’ असल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाने एका पत्रकान्वये केला आहे. प्रांताधिकारी प्रशासनास या संदर्भात निवेदन देवून समस्या सोडवण्याची मागणी करण्यात आली आहे. पालिकेच्या दवाखान्यात शवविच्छेदन पूर्ववत सुरू करावे, 24 तास वैद्यकीय सेवा उपलब्ध होण्यासाठी डॉक्टरांची नियुक्ती करावी तसेच पुरेसा औषधसाठा उपलब्ध असावा आदी मागण्या करण्यात आल्या असून निवेदनाची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शहराध्यक्ष गणेश इंगळे यांनी पत्रकान्वये दिला आहे.
या पदाधिकार्यांच्या निवेदनावर स्वाक्षर्या
जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, तालुकाध्यक्ष अॅड.मनोहर सपकाळे, जिल्हा संघटक शिवाजी टेंभुर्णीकर, शांताराम नरवाडे, किशोर सोनवणे, संदीप रोकडे, प्रितम इंगळे, निलेश बिर्हाडे, अजय वानखेडे, संतोष वानखेडे, वसंत बाविस्कर, उत्तम इंगळे, नंदा तायडे आदींच्या निवेदनावर स्वाक्षर्या आहेत.