शहरातील अंतर्गत रस्त्यांची ट्रीमीक्स पद्धत्तीने होणार कामे -नगराध्यक्ष रमण भोळे
भुसावळ- पालिकेची सर्वसाधारण सभा गुरुवार, 30 रोजी सकाळी 11 वाजता गोपाळ नगरातील पालिकेच्या सभागृहात होत आहे. सभेच्या अजेंड्यावर शहर विकासाचे एकूण 39 विषय घेण्यात आले आहे. शहरातील मुख्य वर्दळीच्या रस्त्यांचे ट्रीमीक्स पद्धत्तीने बांधकाम करण्यासंदर्भात महत्वपूर्ण ठराव त्यात घेण्यात आले असल्याची माहिती नगराध्यक्ष रमण भोळे यांनी ‘दैनिक जनशक्ती’शी बोलताना दिली. या शिवाय शहरातील विविध भागात गटारी, ढापे यासह अन्य विषयांनाही प्राधान्य देण्यात आल्याचे ते म्हणाले.
असे आहेत सभेच्या अजेंड्यावरील विषय
रॉ वॉटर केंद्रासाठी 300 एच.पी.चा नवीन पंप खरेदी करणे, पालिकेच्या आरक्षण क्रमांक 143 जागेवर दुकान केंद्र व नगरपालिकेची प्रशासकीय ईमारत बांधणे, यावल रोड, जळगाव रोड, जामनेर रोडवरील तुटलेले सेंट्रल पोल काढून नवीन एलईडी पथदिवे लावणे, इलेक्ट्रीक पोलखरेदी करणे, बाजारपेठ पोलीस ठाणे ते यावल नाक्यापर्यंत रस्त्याचे ट्रिमीक्स पद्धत्तीने काम करणे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते वरणगाव रोड, राष्ट्रीय महामार्गापर्यंत ट्रीमीक्स पद्धत्तीने रस्त्याचे काम करणे, शहरात सीसीटीव्ही बसवणे, पालिकेच्या मुख्याधिकारी व कर्मचार्यांसाठी निवासस्थाने बांधणे यासह अन्य विषयांना प्राधान्य देण्यात आले आहे. नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या अध्यक्षतेखाली सभा होणार आहे.