निवडीनंतर सत्ताधारी व जनआधार विकास पार्टीच्या नगरसेवकांनी केला सत्कार
भुसावळ- पालिकेच्या नगराध्यक्षपदी शेख सईदा शफी यांची मंगळवारी बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर सत्ताधारी व विरोधी असलेल्या जनआधार विकास पार्टीच्या नगरसेवकांनी त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. पालिका सभागृहात उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीसाठी मंगळवारी 12 वाजता विशेष सभा घेण्यात आली. उपनगराध्यक्ष पदासाठी शेख सईदा शफी यांनी अर्ज भरला तर पालिकेतील सत्ताधारी पक्ष भाजपा असल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार महेंद्र पवार यांनी त्यांची बिनविरोध निवड जाहीर केली.