भुसावळ पालिकेतील कर्मचार्यांसह सेवानिवृत्तांना 53 वर्षानंतर प्रथमच 1 रोजी मिळाली पगारासह पेन्शनची रक्कम
कर्मचार्यांनी नगराध्यक्षांसह नूतन मुख्याधिकार्यांचे मानले आभार
भुसावळ- भुसावळ पालिकेच्या कर्मचार्यांसह सेवानिवृत्त कर्मचार्यांना 1965 नंतर प्रथमच 1 रोजी नियमित पगारासह पेन्शनची रक्कम मिळाल्याने त्यांच्यात उत्साह संचारला आहे. पालिकेचे नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यासह नूतन मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर यांचे त्यांनी आभार मानले आहेत. पालिका वर्कर्स युनियनचे अध्यक्ष राजू खरारे, राजेंद्र पाटील, सुहास नाईक, दिनेश अहिरे, अख्तर खान आदींनी या निर्णयाचे स्वागत करीत आभार मानले आहे.