भुसावळ । प्रतिनिधी । जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी गुरुवारी सकाळी-सकाळीच भुसावळ पालिका गाठत दांडीबहाद्दरांना फैलावर घेतले. त्यांनी हजेरी मस्टर तपासत गैरहजर असलेल्या मुकादम व कर्मचार्यांवर त्यांनी पगार कपातीची कारवाई केल्याने पालिकेच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.
गुरुवारी सकाळीच साडेनऊ वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी पालिकेत दाखल झाल्यानंतर अधिकारी व कर्मचार्यांमध्ये मोठी खळबळ उडाली. पालिकेतील अनेक कर्मचारी आणि अधिकारी उशीरा कामावरत येत असून बरेच बहाद्दर अनेकदा दांडी मारत असतात. या पार्श्वभूमिवर, खुद्द जिल्हाधिकारी निंबाळकर यांनीच हजेरी घेतल्यामुळे खळबळ उडाली आहे. यामुळे नियमित वेळेवर येणार्यांनी समाधान व्यक्त केले असले तरी दांडी मारणार्यांच्या गोटात धास्तीचे वातावरण पसरले आहे. शेवटचे वृत्त हाती आले तोपर्यंत जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर हे नगरपालिकेत बसून होते.