भुसावळ- सर्वोच्च न्यायालयाने सन 2004 पासून वेळोवेळी दिलेल्या आदेशाप्रमाणे पेन्शन विक्री व इतर सेवानिवृत्त आर्थिक लाभ मिळाला नसल्याने हा लाभ तत्काळ मिळावा, महाराष्ट्र शासनाच्या आदेशाप्रमाणे सातव्या वेतन आयोगाप्रमाणे व वेतन निश्चिती व सेवानिवृत्ती वेतन निश्चिती करण्यात आलेली आहे, त्याच आदेशात सेवानिवृत्त कर्मचार्यांना सातव्या वेतन आयोग लावणेपासूनचा फरक रोखीने देण्याबाबतचे आदेश असतानाही अद्याप फरक दिलेला नाही हा फरक त्वरीत मिळावा, पीपीओ ऑर्डर देण्यात यावी यासह विविध न्याय मागण्यांसाठी भुसावळ पेन्शनर्स असोसिएशनतर्फे सोमवारी नगरपालिकेवर मोर्चा नेण्यात आला व काही वेळ ठिय्या आंदोलनही करण्यात आले.
शिवसेनेने दिला पाठींबा
पालिका सेवानिवृत्त कर्मचार्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी पालिका प्रशासनाकडून सकारात्मकता दर्शवली जात नाही. यासंदर्भात सेवानिवृत्त कर्मचार्यांच्या मोर्चाला शिवसेनेने जाहिर पाठिंबा दिला. याबाबतचे पत्र शहर प्रमुख बबलू बर्हाटे व संघटन प्रमुख प्रा.धीरज पाटील यांनी म्युनिसीपल पेंन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष एस.एल.पाटील यांना दिले. दरम्यान, या मोर्चात शहरातील शेकडो पेंन्शनर्स कर्मचारी सहभागी झाले. विविध मागण्यांचे निवेदन पालिका अधिकार्यांना देवून आगामी काळात पून्हा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला.