भुसावळ पालिकेने अनुकंपा तत्वावर गरजूंना सामावून घ्यावे

भाजपा नगरसेवक पिंटू कोठारी यांची मुख्याधिकार्‍यांकडे मागणी

भुसावळ : नाशिक विभागात एकमेव ‘अ’ वर्ग असलेल्या भुसावळ नगरपालिकेने अनुकंपा तत्वावर गरजूंना सामावून घ्यावे, अशी मागणी भाजपा नगरसेवक पिंटू (निर्मल) रमेशचंद्र कोठारी यांनी बुधवारी मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली. निवेदनाचा आशय असा की, अनुकंपा तत्वावर नोकरी मिळण्यासाठी गरजूंनी सुमारे 10 ते 12 वर्षांपासून अर्ज केले असून अद्यापपर्यंत पालिका प्रशासनाने दखल घेतलेली नाही. परीवारातील कमावत्या व्यक्तीचे निधन झाल्याने त्याच्या कुटूंबातील सदस्यांची आबाळ होत आहे. अनुकंपा कंपावर नोकरीवर संबंधिताना घेण्यात आल्यास किमान त्यांच्या कुटूंबातील सदस्यांची शिक्षणासह जगण्याची मोठी सोय होणार आहे शिवाय पालिकेचे मनुष्यबळ वाढल्याने कामकाजात गती येणार आहे.