भुसावळ पालिकेवर आता राष्ट्रवादीचा झेंडा फडकणार

0

माजी आमदार संतोष चौधरी : नगरसेवक दुर्गेश ठाकूर यांचा सत्कार

भुसावळ : सत्ताधार्‍यांनी गेल्या तीन वर्षात शहराची अवस्था बकाल गेल्याने जनता संतप्त झाल्यानेच पालिकेच्या पोटनिवडणुकीत भाजपा उमेदवाराला जनतेने नाकारले व यापुढेदेखील भाजपाला कुठल्याही निवडणुकीत यश मिळणार नाही व पालिकेवरदेखील राष्ट्रवादीचाच झेंडा फडकेल, असा आशावाद माजी आमदार संतोष चौधरी यांनी व्यक्त केले. प्रभाग क्रमांक 24 अ च्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार दुर्गेश ठाकूर यांचा विक्रमी मतांनी विजयी झाल्यानंतर त्यांच्या सत्कारप्रसंगी चौधरी प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते. शनी मंदिर वॉर्डातील सियाराम कॉम्प्लेक्समध्ये दुर्गेश ठाकूर यांचा सत्कार करण्यात आला.

जनआधारचे आता राष्ट्रवादीत विलीनीकरण
पालिका निवडणुकीत माजी आमदार चौधरींच्या नेतृत्वात 19 नगरसेवक जनआधार विकास पार्टीच्या बॅनरखाली निवडून आले होते मात्र आता राष्ट्रवादीच्या नगरसेवकाचा विजय झाल्याने जनआधारचे विलीनीकरण करीत असल्याची घोषणा चौधरींनी केली. ते म्हणाले की, आगामी निवडणुका राष्ट्रवादीच्या बॅनरवर आपण लढवू व जनआधारचे विलीनकरण केले जात असून त्या संदर्भात प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाईल. खड्डेमय रस्ते, असुरळीत पाणीपुरवठा, अस्वच्छता व आरोग्याच्या समस्यादेखील सत्ताधारी सोडवू न शकल्याने जनतेचा रोष वाढला असून आता कोणत्याही निवडणुकीत भाजपाला जनता थारा देणार नाही, असा विश्‍वास चौधरींनी व्यक्त केला. पोटनिवडणुकीत धनशक्तीचा तसेच दबावतंत्रांचा वापर झाला मात्र यांना जनतेला सपशेल नाकारल्याचे ते म्हणाले. तीन वर्ष शहरवासीयांना यातना देणार्‍या जनता विसरणार नाही, असेही ते म्हणाले. दुर्गेश यांच्या विजयात बंधू अनिल चौधरींचादेखील वाटा आहे मात्र त्यांची आगामी राजकीय भूमिका तेच स्पष्ट करतील, असेही ते म्हणाले.

यांची होती उपस्थिती
प्रसंगी कृउबा समिती सभापती सचिन चौधरी, माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी, नगरसेवक उल्हास पगारे, सतीश घुले, धीरज चौधरी, बुटासिंग चितोडीया, आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते