भुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस 27 रोजी दौंड मार्गाने धावणार

0

भुसावळ- मध्य रेल्वेच्या बदलापूर-कर्जत दरम्यान तांत्रिक ब्लॉक तसेच पादचारी पुलाच्या कामासाठी 27 रोजी अप 11025 भुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस कल्याणऐवजी मनमाड, दौंड मार्गाने पुणे धावणार आहे तसेच डाऊन गाडी क्रमांक 11026 पुणे-भुसावळ हुतात्मा एक्सप्रेस ही 27 रोजी दौंड मनमाड मार्गाने भुसावळ रेल्वे स्थानकावर येईल. रेल्वे प्रवाशांनी बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.