भुसावळ- पोलिस दप्तरी असलेल्या कुविख्यात गुन्हेगारांच्या झडती पोलिस पथकाने गुरुवारी मध्यरात्री घेत कोम्बिंग राबवलयाने गुन्हेगारांच्या उरात धडकी भरली. रात्री एक ते तीन दरम्यान चाललेल्या या कारवाईत संशयास्पद काहीही आढळले नाही. डीवायएसपी गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्यासह त्यांच्या पोलिस ठाण्यातील कर्मचार्यांनी रात्री एक वाजता कोम्बिंग ऑपरेशन राबवले. कंडारी, हद्दिवाली चाळ, महात्मा फुले नगर आदी भागात जाऊन गुन्हेगारांची घरी जावून ते घरी आहेत वा नाही? याबाबत झडती घेतली. डीवायएसपी, पोलिस निरीक्षक यांनी 12 जणांची कसून चौकशी चालविली. ते काय करतात, पोट भरण्याचे साधन काय, दिवसा काय काम करतात याची माहिती घेतली. शहरातील होत असलेल्या गुन्हेगारीत यादीवरील कोणी संशयीतांचा सहभाग आहे का याची पडताळणी डीवायएसपी राठोड यांनी केली. शहर पोलिस ठाण्याच्या हद्दित पोलिसांच्या यादीवर 12 जण असून ते सर्वच्या सर्व पोलिसांच्या सर्च ऑपरेशनमध्ये घरीच मिळून आले. त्यांना रात्रीच पोलिस ठाण्यात आणून त्यांची चौकशी करण्यात आली.