प्रशिक्षणासाठी तहसीलदार दिड महिना सुटीवर
भुसावळ– तहसीलदार विशाल नाईकवडे हे प्रशिक्षणासाठी दिड महिना सुटीवर गेल्याने त्यांच्या पदाचा पदभार नायब तहसीलदार संजय तायडे यांच्याकडे गुरुवारपासून सोपवण्यात आला. 20 ऑगस्ट रोजी नाईकवडे हे धुळे येथे प्रोबेश्नरी तहसीलदार म्हणून रूजू झाले होते. प्रोबेशन काळातील प्रशिक्षणासाठी ते गुरुवार, 15 फेब्रुवारी ते 2 एप्रिल दरम्यान सुटीवर गेले असून या काळात ते दिल्ली तसेच महाराष्ट्र दर्शनासह यशदा, पुणे येथे भेट देणार आहेत. या काळात प्रभारी तहसीलदार म्हणून तायडे हे काम पाहणार आहेत.