भुसावळ प्रभारी नगराध्यक्षपदाचा मुकूट अखेर ‘युवराज लोणारींना’

0

‘स्वप्न’ झाले पूर्ण ; शहर विकासाची ग्वाही

भुसावळ – कुंडलीत राजयोग नाहीत म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून नगराध्यक्षपदाचा मुकूट मिळवण्याची स्वप्न पाहणार्‍या उपनगराध्यक्ष युवराज लोणारी यांना गुरुवारी एका महिन्यासाठी का असेना प्रभारी नगराध्यक्षपदाचा मुकूट मिळाल्याने त्यांच्यासह समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, भाजपा सरचिटणीस प्रा.सुनील नेवे यांच्यासह भाजपा नगरसेवकांच्या उपस्थितीत लोणारी मंगल कार्यालयात झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. याप्रसंगी आमदार सावकारे म्हणाले की, लोणारी यांना आम्ही एका महिन्यासाठी प्रभारी नगराध्यक्षपदाचा पदभार देत आहोत. त्यांनी समाधानकारक काम केल्यास आम्ही कार्यकाळ वाढवून देवू. सावकारे म्हणाले की, लोणारींना नगराध्यक्षपदी विराजमान होवू देणार नाही, असे सांगणार्‍यांसाठी आज लोणारींची झालेली निवड चपराक आहे.

प्रभारी नगराध्यक्ष लोणारी म्हणाले की, नेत्यांनी संधी दिल्याने आपण त्यांचे आभार मानत असून शहराचा आपण निश्‍चित चेहरामोहरा बदलवू.