भुसावळ : वरणगाव शहरात भाजपाच्या काळात मंजूर झालेल्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाला गती द्यावी, शहरात निर्माण झालेला पाणीप्रश्न निकाली काढावा या प्रमुख मागणीसाठी भुसावळ प्रांताधिकारी कार्यालयावर वरणगावातील भाजपा पदाधिकार्यांनी सोमवार, 6 जून रोजी मोर्चा काढत जोरदार घोषणाबाजी केली. याप्रसंगी प्रांत प्रशासनाला निवेदन देवून समस्या सोडवण्याची मागणी करण्यात आली तसेच वरणगावबाबतही प्रांताधिकारी बैठक घेण्याची मागणी करण्यात आली. यावेळी तहसीलदार दीपक धीवरे यांनाही निवेदन देण्यात आले.
वरणगावकरांना पाणीटंचाईच्या झळा
वरणगाव शहरात गेल्या 10 ते 12 दिवसांपासून पाणीपुरवठा होत असल्याने शहरात भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. पाणीपुरवठा सुरळीत झाला पाहिजे तसेच भाजपा सरकारने वरणगाव शहरासाठी 24 तास पाणीपुरवठा योजना मंजूर करून दिल्याने या योजनेचे संथगतीने चालणारे काम काम जलद गतीने सुरू व्हावे या मागणीसाठी अलीकडे भाजपाने वरणगाव शहरात जलआक्रोश मोर्चा काढून आंदोलन केले. याबाबतच्या भावना प्रांत कार्यालयावर सोमवारी भाजपाच्या वतीने माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून मांडण्यात आल्या.
मग वरणगावसाठी का बैठक नाही ?
प्रांताधिकारी यांच्या वतीने निवेदन नायब तहसीलदार प्रीती लुटे व तहसीलदार धीरज धीवरे यांना देण्यात आले. निवेदनाची दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला. प्रांताधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत राऊत यांच्या उपस्थितीत फुलगावसाठी बैठक घेण्यात आली मात्र वरणगावसाठी अशी बैठक का नाही ? असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला. वरणगाव शहरातील जनता पाण्या साठी रस्त्यावर उतरली असताना प्रशासन याची दखल घेत नसल्याची शोकांतिका असल्याचे यावेळी सुनील काळे म्हणाले.
यांचा आंदोलनात सहभाग
यावेळी महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा शैलजा पाटील, शहराध्यक्ष सुनील माळी, शहराध्यक्ष आकाश निमकर, जिल्हा चिटणीस गजानन वंजारी, जिल्हा उपाध्यक्ष अॅड.ए.जी.जंजाले, मिलिंद भैसे, गोलू राणे, ज्ञानेश्वर घाटोळे, तालुकाध्यक्ष साबीर कुरेशी, योगेश माळी, तालुकाध्यक्ष मनीषा पाटील, अनिरुद्ध कुलकर्णी, आकाश महाजन, सुमित तायडे, हितेश चौधरी, रमेश बैरागी, भाजयुमो तालुका उपाध्यक्ष संदीप भोई, किरण वंजारी, पप्पू ठाकरे, बबलू शेख, गोलू गव्हाळे, विक्की चांदेलकर, मुस्लिम भाई, अन्सारी मयूर गावंडे, योगेश माळी यांच्यासह भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.