भुसावळ बसस्थानकाचा झाला तलाव : वृक्षारोपण करीत प्रशासनाचा निषेध

भुसावळ : हजारो प्रवाशांचा वावर असलेल्या शहरातील बसस्थानकाची प्रचंड दुरवस्था झाली असून बसस्थानकात पावसाच्या पाण्यामुळे तळे निर्माण झाल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. एस.टी.प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी व लोकप्रतिनिधींना जाग येण्यासाठी संविधान आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष व पीआरपी प्रदेश उपाध्यक्ष जगन सोनवणे यांच्या नेतृत्वात शुक्रवारी दुपारी आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी बसस्थानकात निर्माण झालेल्या तळ्यात कागदी नाव सोडण्यात आल्या तसेच वृक्षारोपण करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. याप्रसंगी मागण्यांचे निवेदन एस.टी.प्रशासनाला देण्यात आले.

यांची होती उपस्थिती
प्रसंगी संविधान आर्मी प्रदेश प्रमुख राकेश बग्गन, एकनाथ पाटील, अमोल पाटील, सादीक शेख, संदीप पन्नाड, आकाश नारखेडे व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.