भुसावळ: रेल्वे स्थानक परीसराच्या अद्ययावतीकरणासाठी रेल्वे प्रशासनाने बसस्थानकाच्या पूर्वेकडील प्रवेशद्वार शनिवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास बंद केले. या संदर्भात रेल्वे प्रशासनाने बसस्थानकाच्या आगार प्रमुखांना पत्रव्यवहार करून यापूर्वीच सूचित केले होते. रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे स्थानक परीसराचा विकास केला जात असून त्या अनुषंगाने बसस्थानकाचा पूर्वेकडील प्रवेशद्वार शनिवारी बंद करण्यात आल्याने आता वरणगाव, मुक्ताईनगर भागातून येणार्या बसेस या बसस्थानकातून बाहेर पडणार्या मार्गातून बसस्थानकात प्रवेश करीत असल्याने वाहतूक कोंडीचा सामना वाहनधारकांना करावा लागत आहे.