भुसावळ- बसस्थानकाजवळील भिंतीला लागून शनिवारी कसाळी 11 वाजेच्या सुमारास 40 ते 45 महिलेचा मृतदेह आढळला. ही महिला बेवारस असून ओळख पटत असल्यास बाजारपेठ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिस उपनिरीक्षक मनोज ठाकरे यांनी केले आहे. उंची पाच फूट, रंग सावळा, नाक बसके, डोळे मोठे, डोक्याचे केस अर्धवट कापलेले, हातपावर-पायावर व पाठीवर जुन्या जखमा, अंगात गुलाबी रंगाचे ब्लाऊज व पिवळी साडी असे वर्णन आहे. बाजारपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.