भुसावळ बसस्थानकाला समस्यांच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी शिवसैनिकांचा ठिय्या

0

आगार प्रमुखांना आंदोलकांनी विचारला जाब ; प्रवाशांना सुविधा न पुरवल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा

भुसावळ- शहरातील बसस्थानकाची दुर्दशा झाल्याने प्रवाशांना होणार्‍या मनस्तापाची दखल घेत शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी शनिवारी बसस्थानकात ठिय्या मांडून आगारप्रमुखांना धारेवर धरत जाब विचारला. आगामी दिवाळी सणापूर्वी प्रवाशांना सर्वोतोपरी सुविधा तसेच बसस्थानकाची स्वच्छता करून प्रवाशांना सौजन्याची वागणूक द्यावी अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना दक्षिण विभागाचे शहर प्रमुख बबलू बर्‍हाटे यांना दिला. आगार प्रमुख बी.एच.भोई यांना निवेदन देण्यात आले.

बसस्थानक मोजतेय अखेरची घटका
शहरातील बस स्थानकावरील बसण्याची बाके गायब झाल्याने ज्येष्ठ नागरीक, प्रवाशांचे हाल होत आहेत. काही वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च करून भुसावळ स्थानकात बाके लावण्यात आली मात्र यापैकी अनेक बाके गायब झाली आहेत. सध्या सणासुदीचे दिवस असल्याने प्रवाशांची गर्दी वाढणार आहे तर बसस्थानकातील असुविधांमुळे प्रवासी त्रस्त आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून या समस्येचा त्रास येथील ज्येष्ठ नागरीक आणि प्रवाशांना मनस्ताप सोसावा लाागत असल्याच्या भुसावळ शिवसेनेकडे आल्यानंतर पदाधिकार्‍यांनी शनिवारी बसस्थानक गाठत आगारप्रमुखांना जाब विचारला. बसस्थानकात प्रवाशांना बसण्यासाठी जागा नसल्याने जाहिरात फलकाखाली प्रवाशांनी गर्दी केली होती तर सर्वत्र अस्वच्छता असल्याने प्रवाशांमधून संताप व्यक्त होताना दिसून आला शिवाय कचरा पेटवल्यामुळे प्रदूषण तसेच बसस्थानकात मोकाट गुरां-ढोरांसह कुत्र्यांचा असलेल्या उपद्रवाबाबतही प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. महिला कर्मचार्‍यांना सुद्धा बैठकीची व्यवस्था नसल्याने त्यांच्यासाठी स्वतंत्र सुविधा का नाही? असा सवाल तालुका संघटक प्रा.धीज पाटील यांनी प्रसंगी उपस्थित केला. निदान सुट्टीच्या व गर्दीच्या हंगामामध्ये बसस्थानकावर महामंडळाने तरी दिवाळी सुरू होण्याआधी सर्व सुविधा द्याव्यात, अशी मागणी शिवसेना भुसावळ शहर प्रमुख बबलू बर्‍हाटे यांच्या वतीने करण्यात आली.

बसस्थानकाची दुर्दशा न थांबवल्यास आंदोलन
बसस्थानकाची दुर्दशा न थांबवल्यास शिवसेना जळगाव जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील, उपजिल्हा संघटक विलास मुळे, तालुका प्रमुख समाधान महाजन, तालुका संघटक प्रा.धीरज पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख संतोष सोनवणे, विधानसभा क्षेत्र संघटक निलेश सुरळकर, उपतालुका प्रमुख मनोहर बारसे, शहर प्रमुख (दक्षिण विभाग) बबलू बर्‍हाटे, शहर प्रमुख (उत्तर विभाग) निलेश महाजन, शहर संघटक योगेश बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन केले जाईल, असा इशारा प्रसंगी देण्यात आला.

यांची होती उपस्थिती
प्रसंगी तालुका संघटक प्रा.धीरज पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख संतोष सोनवणे, शिक्षक सेनेचे जिल्हा प्रमुख प्राचार्य विनोद गायकवाड, शहरप्रमुख बबलू बर्‍हाटे, निलेश महाजन, शहर संघटक सुनील बागले, शहर संघटक योगेश बागुल, उपशहर प्रमुख अन्सार शाह, उपशहर प्रमुख घनश्याम ठाकूर, उपशहर प्रमुख राकेश खरारे, उपशहर संघटक नबी पटेल, उपशहर संघटक प्रसिद्धी प्रमुख दत्तू नेमाडे, अबरार ठाकरे, अखतर खान, हेमंत बर्‍हाटे, विकास खडके, नितीन पाटील, रिझवान रहीम, सद्दाम शेख, सुरज पाटील, भूषण कोळी, फिरोज तडवी, शेख नजीर, ग्राहक संरक्षक शहरप्रमुख मनोज पवार, अल्पसंख्याक विभाग शहर प्रमुख शेख मेहमूद, राकेश चौधरी, निखिल बर्‍हाटे, चेतन वाघ, जावेद जाफर, दीपक जाधव, रितेश राणे, सनी जोहरे, हर्षल पाटील, राहुल सावकारे, रवी केतवाझ, रोहित नागदेव, उपस्थित होते.