भुसावळ : बाजारपेठ पोलिस ठाण्यात दारू अधिनियमांतर्गत दाखल गुन्ह्यातील हिस्ट्रीशीटर न्यायालयीन तारखेवर हजर राहत नसल्याने त्याच्याविरुद्ध पकड वॉरंट काढण्यात आल्यानंतर त्यास गुरुवारी अटक करण्यात आली. जावेद उर्फ काल्या आसीफ शहा (रा.पापानगर, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक चंद्रकांत बोदडे, रमण सुरळकर, महेश चौधरी, विकास सातदिवे, ईश्वर भालेराव आदींनी केली.