भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्याचे डीबी पथक बरखास्त

0

भुसावळ- भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यातील डीबी पोलिसांचे पथ नूतन निरीक्षक देविदास पवार यांनी बरखास्त केले आहे. डीबीतील कर्मचार्‍यांनी आता गणवेशात हजर राहण्याची सूचना निरीक्षकांनी केली असून लवकरच कार्यक्षम कर्मचार्‍यांचे डीबी पथकाचे गठण केले जाणार आहे. या पथकात मोजकेच कर्मचारी राहणार आहेत. चोरी प्रकरणातील गुन्हेगारांचा शोध घेणे, गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी ज्या कर्मचार्‍यांचे नेटवर्क चांगले आहे, अशाच कर्मचार्‍यांचा डीबी पथकात घेतले जाईल, असे डीवायएसपी गजानन राठोड म्हणाले.