भुसावळ- बाजारपेठ पोलिस ठाण्यात तिघांनी हाणामारी करीत शिवीगाळ केल्याने संशयीतांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 18 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता ही घटना घडली. संशयीत शेख शाहरूख शेख अयुब, शेख अयुब शेख इब्राहीम, जोएफ शेख जाफर (सर्व रा.मुस्लीम कॉलनी) यांनी पोलिसांसमक्ष एकमेकांना शिवीगाळ करीत झोंबाझोबी केल्याने त्यांच्याविरुद्ध भादंवि 160 प्रमाणे कॉन्स्टेबल संदेश निकम यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस नाईक सुभान तडवी करीत आहेत.