भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्याचे ‘त्या’ दोघा कर्मचार्‍यांचे अखेर निलंबन

0

प्रस्तावावर जिल्हा पोलिस अधीक्षक पंजाबराव उगलेंची तातडीने अंमलबजावणी

भुसावळ- मद्यधूंद अवस्थेत बाजारपेठ पोलिस ठाण्यातील कर्मचारी योगेश माळी व शशी तायडे यांनी जीम चालक तथा तक्रारदार जुबेरखान नईम खान पठाण (33, ग्रीन पार्क, भुसावळ) यांना मारहाण केल्याची घटना 7 रोजी रात्री 12.15 वाजेच्या सुमारास रेल्वे स्थानकाबाहेर घडली होती. आरोपी पोलिसांविरुद्ध बाजारपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना अटकही करण्यात आली होती. नंतर संशयीतांची जामिनावरही सुटका करण्यात आली होती तर दोघाही पोलिसांच्या निलंबनाचा प्रस्ताव बाजारपेठ पोलिस निरीक्षकांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे पाठवण्यात आल्यानंतर सोमवारी सायंकाळीच या पोलिसांना तडकाफडकी निलंबित करण्यात आल्याने जिल्हा पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.

दबंग कर्मचार्‍यांचे अखेर निलंबन
जीम चालकाला अमानुषपणे पोलिसांकडूप होणार्‍या मारहाणीचा व्हिडिओदेखील सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर पोलिस निरीक्षक देविदास पवार यांनी गांभीर्याने दखल घेत दोघाही पोलिसांच्या निलंबनाचा प्रस्ताव रविवारी सायंकाळीच जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांच्याकडे रवाना केला होता. सोमवारी जिल्हा पोलिस अधीक्षकांनी या कर्मचार्‍यांना निलंबीत केल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे.