भुसावळ बाजारपेठ पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला

भुसावळ प्रतिनिधी दि 2

येथील बाजारपेठ पोलीस स्टेशनला दाखल गुन्ह्यातील फरार आरोपी हा फैजपूर हद्दीतील महेंद्र ढाबा येथे येत असल्यांची गोपनीय बातमी पोलीस अधिकारी यांना मिळाली असता पथकास तात्काळ दालनात बोलावून संशयित आरोपीस ताब्यात घेण्याबाबत सूचना देऊन कारवाई करण्याचे आदेश दिल्यावरून पथक घटनास्थळी रवाना झाले व मिळालेल्या माहितीची खात्री केली असता संशयित आरोपी आल्याचे निष्पन्न झाले असता. महेंद्र ढाबा जवळ रोडवर सापळा रचून ताब्यात घेत असतांना पोकॉ.प्रशांत सोनार यास (ता. १) सप्टेंबर रोजी रात्री बारा वाजून वीस मिनिटांनी निखिल राजपूत याने फायटर ने उजव्या डोळ्याखाली मारून धक्का बुक्की केली तसेच हल्ला करून – डिझायर गाडीतून पळून गेले. म्हणून फैजपूर पोलीस स्टेशनला संशयित आरोपी निखिल राजपूत, अनिषा उर्फे मोही रितेश रतनानी सोबत तीन अनोळखी इसमांविरुध्द पोकॉ.प्रशांत सोनार (नेमणूक बाजारपेठ पोलीस स्टेशन) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फैजपूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा अधिक तपास पीएसआय लोखंडे करीत आहे.