भुसावळ प्रतिनिधी दि 22
महाराष्ट्र राज्य विक्री व प्रतिबंधित असलेला मानवी आरोग्यास अपायकारक असलेला असा तंबाखू जन्य पदार्थ व सुगंधीत पान मसाला गुटख्याची वाहतूक करतांना अंदाजे पन्नास लाखांचा गुटखा व दहा लाखांचे कंटेनरसह असा एकूण साठ लाखांचा मुद्देमाल बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी जप्त केलेला आहे. सदरील कंटेनर हे इंदूर येथील ट्रान्सपोर्ट ने काही माल भुसावळ शहरात उतरण्यात येणार होता. या मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी पथकास सूचना देऊन कंटेनर ताब्यात घेऊन तालुका पोलीस स्टेशनला कारवाई साठी लावण्यात आलेला आहे. याप्रकरणी सायंकाळी बाजारपेठ पोलीस ठाण्यात सदर तंबाखूजन्य पदार्थ बंदी असतांना वाहतूक करणाऱ्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
याबाबत बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे इंदोर येथील ट्रान्सपोर्टच्या
एका कंटेनर मधून महाराष्ट्र राज्यात बंदी असलेल्या गुटख्याची वाहतूक होत आहे. या माहितीच्या आधारे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना दालनात बोलावून सदरील ट्रक ताब्यात घेण्याबाबतच्या सुचना दिल्या.
सदरील कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये, सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश जाधव, पोहेकॉ. सुनील जोशी, विजय नेरकर, उमाकांत पाटील, निलेश चौधरी, रमण सुरडकर, यासीन पिंजारी, सचिन चौधरी, जावेद शहा योगेश माळी, प्रशांत सोनार, प्रशांत परदेशी, भरत बाविस्कर या टीमने इंदोर येथील लॉजिस्टिक ट्रान्सपोर्ट चा विविध वस्तू घेऊन निघालेले संशयित कंटेनर ( क्रमांक यू.पी 78 सी.ए 5698) हा औरंगाबाद कडे जात असतांना तालुका पोलीस ठाण्यासमोर थांबवला. सदरील कंटेनर उघडून त्याची तपासणी केली असता यामध्ये राजनिवास नावाचा जवळपास 50 लाखांचा गुटखा पोलिसांना वाहतूक होतांना मिळून आला. सदरील कंटेनर समोरून डाक पार्सल असे लिहिलेले आहे तर कंटेनरला मागच्या बाजूने नंबर प्लेट नाही..
सदरील कारवाई दरम्यान पोलिसांनी कंटेनर (ता. २०) रोजी ताब्यात घेऊन तालुका पोलीस स्टेशनच्या आवारात लावण्यात आलेला होता. ( ता.२१) रोजी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान अन्न व औषध प्रशास विभागाचे कर्मचाऱ्यांनी तसेच बाजारपेठ पोलीस स्टेशन चे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पंचनामा करून बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरा पर्यंत सुरू होती.