भुसावळ बाजार मक्ताप्रकरणी दोषारोपपत्र दाखल

0

भुसावळ- डेली बाजार व सायकल स्टॅण्ड वसुलीत 22 लाख 40 हजारांचा अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांच्यासह तत्कालीन नगरसेविका कविता अशोक चौधरी, शारदा झोपे, शोभा जिजाबराव सपकाळे, सुशीला अहिरे, अब्दुल जलील शेख रहेमान कुरेशी यांच्यासह तत्कालीन मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर, अनिल जगताप व ठेकेदार विकास प्रकाश पाटील यांच्याविरुद्ध बाजारपेठ पोलिसात सेवानिवृत्त नगरपालिका कर्मचारी सुरेश पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल होता. जळगाव आर्थिक गुन्हे शाखेकडे या गुन्ह्याचा तपास आल्यानंतर बुधवार, 30 रोजी भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयात या गुन्ह्याचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आल्याचे तपासाधिकारी तथा सहाय्यक पोलिस विजय देशमुख यांनी ‘दैनिक जनशक्ती’शी बोलताना सांगितले. उमेश नेमाडे यांच्या काळात 27 मे 2013 ते 31 मार्च 2014 या काळात बाजार मक्ता व सायकल स्टॅण्ड वसुलीत अपहार झाल्याचा आरोप आहे. दरम्यान, एस.एल.पाटील यांनी आर्थिक फसवणुकीबाबत तब्बल सात गुन्हे दाखल केले होते तर शुक्रवारीदेखील या संबंधीत एका गुन्ह्याचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल होण्याची शक्यता आहे.