भुसावळ : भारतीय जनता पार्टी भुसावळ शहराच्या वतीने भाजपा जिल्हाध्यक्ष हरीभाऊ जावळे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रसंगी भाजपाचे जिल्हा संघटन सरचिटणीस प्रा.सुनील नेवे यांनी थोडक्यात हरीभाऊंच्या जीवनपट आणि त्यांच्या कामांविषयी माहिती दिली.
यांची होती उपस्थिती
यावेळी भुसावळ तालुक्याचे आमदार संजय सावकारे, लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे, ओबीसी मोर्चा प्रदेश सरचिटणीस अजय भोळे, शहराध्यक्ष दिनेश नेमाडे, सरचिटणीस पवन बुंदेले आणि अमोल महाजन, नगरसेवक अमोल इंगळे, गिरीष महाजन, वसंत पाटील, मुकेश पाटील, देवा वाणी, सतीश सपकाळे, पुरुषोत्तम नारखेडे, अजय नागराणी, अॅड.बोधराज चौधरी, किशोर पाटील आणि पदाधिकारी प्रमोद पाटील, रमाशंकरजी दुबे, गौरव लोणारी, शाम भांरबे, चेतन बोरोले आदी उपस्थित होते.