भुसावळ भाजपातर्फे ‘मेरा परीवार भाजप परीवार’ उपक्रम

0

भुसावळ- भाजपा कार्यकर्त्यांनी 12 फेबु्रवारी ते 2 मार्चदरम्यान आपापल्या घरात भारतीय जनता पार्टीचा ध्वज व स्टीकर लावण्याचे आदेश पक्ष श्रेष्ठींनी दिल्यानंतर भुसावळ भाजपाचे संघटन सरचिटणीस प्रा.डॉ.सुनील नेवे यांच्या शांती नगरातील ‘अटल’ निवासस्थानी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी सकाळी ध्वज लावण्यात आला.

यांची होती उपस्थिती
यावेळी नगराध्यक्ष रमण भोळे, नगरसेवक युवराज लोणारी, पिंटू कोठारी, राजेंद्र नाटकर, अमोल इंगळे, वसंत पाटील अ‍ॅड.बोधराज चौधरी, गिरीश महाजन. सरचिटणीस रमाशंकर दुबे, पवन बुंदेले, ई.जी.नेहते, प्रा.प्रशांत पाटील, संतोष बारसे, किरण कोलते, शैलजा पाटील, प्रमोद सावकारे, दिनेश नेमाडे, पुरूषोत्तम नारखेडे, सुमित बर्‍हाटे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.