भुसावळ : भुसावळ विभागातील रनिंग स्टाफ कर्मचारी प्रामाणिकपणे कर्तव्य बजावत असतून कर्मचार्यांच्या न्याय मागण्यांबाबत वारंवार आवाज उठवूनही रेल्वे प्रशासन या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याने नॅशनल रेल्वे मजदूर यूनियनने रनिंग स्टाफ कर्मचार्यांच्या मागण्या मान्य होण्यासाठी आंदोलन छेडले होते. 4 रोजी सी.वाय.एम.ऑफिस, गुड्स लॉबी व 6 रोजी पॅसेंजर लॉबीत द्वारसभा घेण्यात आली. मागण्या मान्य न केल्यास 11 रोजी डीआरएम कार्यालयावर मोर्चा व धरणे आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. आंदोलनाच्या इशार्यानंतर प्रशासनाने बैठक बोलावी व त्यात कर्मचार्यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या. मागण्या मान्य झाल्यानंतर रनिंग कर्मचार्यांनी मंडल रेल प्रबंधक कार्यालय कार्यालयासमोर फटाके फटाक्यांची आतषबाजी करीत आनंद व्यक्त केला. कर्मचार्यांनी कॉमरेड वेणु पी.नायर यांचे आभार मानले.
यांची होती उपस्थिती
यावेळी मंडळ अध्यक्ष कॉ.पुष्पेंद्र कापडे, मंडल सचिव कॉ.आर.आर.निकम यांनी सविस्तर माहिती कर्माचार्यांना दिली. अध्यक्ष कॉ.आर.पी.भालेराव, शाखा सचिव कॉ.ए.टी.खंबायत, कॉ.एस.बी.तळेकर, कॉ.प्रदीप गायकवाड, कॉ.डी.बी.महाजन, कॉ.संजय श्रीनाथ, कॉ.अनिल मालवीय, कॉ.डी.आर.सयाम, कॉ.मोहम्मद असलम, कॉ. सचिन वाघ, कॉ.एस.एस.वानखेडे आदींनी परीश्रम घेतले.