भुसावळ मध्ये 53 क्विंटल केमिकल युक्त खवा जप्त

भुसावळ प्रतिनिधी दि 24

आगामी सणासुदीच्या

पार्श्वभूमिवर, बाजारात नकली खवा येत असून आज भुसावळ

पोलिसांनी तब्बल ५३ क्विंटल इतका याच प्रकारचा बनावट खवा जप्त

केल्याने एकच खळबळ उडाली आहे. यामुळे बाजारातून खव्यापासून

तयार केलेल्या मिठाया घेतांना सावध राहण्याची आवश्यकता निर्माण

झाली आहे.

आगामी गणोशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर गणेशोत्सवा दरम्यान गणपती बाप्पा यांना मोदकाचा प्रसाद तसेच पेढयाचा प्रसाद भावीक जास्त प्रमाणात चढवित असतात. सदर मोदक व पेढे बनविणेकामी स्वीट विक्रेते हे खव्याचा सर्रास वापर करीत असतात त्याअनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे, भुसावळ यांना सुमारे ४/५ दिवसापूर्वी बातमी मिळाली की, भुसावळ शहरात लक्झरी मधून अहमदाबाद (गुजराथ) येथून बनावट खवा (मावा) हा बेकायदेशीररित्या आणून येथून दुसरीकडे डेअरी चालक व हॉटेल चालकांना विक्री करणार असले बाबत माहिती मिळाली.

या अनुषंगाने, डीवायएसपी कष्णात पिंगळे यांनी कार्यालयाचे पोहेकॉ सुरज पाटील यांना त्यांनी सदर बातमी बाबत सुचना दिल्या. त्यानुसार पोहेकॉ. सुरज पाटील यांनी इत्यंभूत माहिती गोळा करुन उप विभागीय पोलीस अधिकारी पिंगळे यांना दिली.त्यानुसार आज दि.२२ रोजी ११.०० वाजेच्या सुमारास सदर बनावट मावा आणून पुढील विक्रीसाठी गाडी मध्ये लोड करीत असतांना उपविभागीय पोलीस अधिकारी, भुसावळ उपविभाग यांचे कड पथकाचे अंमलदार पोहेकॉ. सुरज पाटील, पोहेकॉ. संदिप चव्हाण, चासफौ. अनिल चौधरी, पोना. संकेत झांबेर अशांना रवाना केले.

 

या पथकाने सदर लक्झरी बस ही अहमदाबाद येथून युरिया सदृश्य बनावट खवा च्या एकूण १७८ बॅग ह्या वेगवेगळया डेअरीवर पोहचविणेकामी देण्यात आले होते.

सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांचे मार्गदर्शनाखाली कृष्णात पिंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, भुसावळ उपविभाग, यांचे नेतृत्वात पोहेकॉ. सुरज पाटील, पोहेकॉ. संदिप चव्हाण, चासफौ. अनिल चौधरी, पोना. संकेत झांबरे यांनी केली आहे….या कार्यवाहीत एकूण ४२ खोके व १३६ बॅग अश्या एकूण १७८ प्रत्येकी ३० किलो प्रमाणे एकूण ५३४० किलो अशी एकूण ११,७४,८००/- रुपये किमतीचा माल आणणारे एम. के. बस सहस लक्झरी बस क्र. जीजे ०१-ईटी-१२१० वरील चालक कन्नु पटेल, वय-३७, रा. अमदाबाद व आयशर गाडी क्र. जीजे ३८-टिए – १८०० या गाडीवरील चालक सैय्यद साबीर सैय्यद शब्बीर, वय ३५, रा. अहमदाबाद (गुजराथ) यांचेसह मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.

जप्त केलेला बनावट खवा हा सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन यांचेकडे पुढील योग्य त्या कारवाईसाठी सदर मुद्देमाल वर्ग करण्यात आला आहे. आगामी सणासुदीच्या आधी इतक्या मोठ्या प्रमाणात बनावट खवा जप्त करण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडालेली आहे.