भुसावळ-मनमाड व भुसावळ-नंदुरबार पॅसेंजर सुरू करा

0

भुसावळ : जळगाव हे जिल्ह्याचे ठिकाण असून जळगावमध्ये जैन कंपनी सारख्या अनेक मोठ्या कंपन्या आहेत सोबतच जळगावला एम.आय.डी.सी.सुद्धा आहे. त्यामुुळे भुसावळ येथून जळगावला ाणार्‍यांची संख्या खूपप मोठी आहे. सध्या पावसाळा सुरू झाल्याने रोज जळगाव-भुसावळ अप-डाऊन करणार्‍यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे त्यातच जळगावला जाणार्‍या रस्त्याचे काम सुरू असल्याने अपघाताचे प्रमाण सुद्धा वाढलेले आहे. अशात दवाखाने बंद असल्याने अपघाती व्यक्तीला खूपच अडचणींचा सामना करावा लागत असलाने पहाटे सहा वाजेला असणारी मुंबई पॅसेंजर ही कमीत-कमी मनमाडपर्यंत सुरू करावी व सकाळी आठ वाजात सुटणारी सुरत पॅसेंजर ही नंदुरबार पर्यंत सुरू करावी जेणे करून आपल्या कुटुंबाचा उदर-निर्वाह करण्यासाठी रोज अप-डाऊन करणार्‍या प्रवाशांचा त्रास कमी होईल, अशी आशा माजी नगरसेवक दीपक धांडे यांनी व्यक्त केली आहे.

रेल्वे प्रशासनाकडून अपेक्षा
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या निवेदनाचा गांभीर्यपूर्वक विचार करून हजारो चाकरमान्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा माी नगरसेवक दीपक काशिनाथ धांडे यांनी व्यक्त केली आहे.