प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांचे आदेश ; उपद्रवी 19 ते 24 दरम्यान राहणार शहराबाहेर
भुसावळ- सामाजिक शांततेला धोका ठरू पाहणार्या व पोलिस दप्तरी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या भुसावळसह मुक्ताईनगर व वरणगावातील तब्बल 86 उपद्रवींना लोकसभा निवडणुकीच्या काळात 19 ते 24 दरम्यान सहा दिवस शहर बंदी करण्याचे आदेश प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी शुक्रवारी काढल्याने खळबळ उडाली आहे. शहरबंदी झालेल्यांमध्ये शहर हद्दीतील दोन, बाजारपेठ हद्दीतील 35, वरणगावातील पाच तर मुक्ताईनगरातील 44 उपद्रवींचा समावेश आहे.