भुसावळ मुख्याधिकारीपदी रोहिदास दोरकुळकर

0

जिल्ह्यातील मुख्याधिकार्‍यांच्या बदल्यांचे आदेश

भुसावळ- भुसावळ पालिकेच्या मुख्याधिकारीपदी नाशिक महानगरपालिकेचे उपायुक्त रोहिदास दोरकुळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या संदर्भातील आदेश नगरविकास विभागाचे सहसचिव सं.श.गोखले यांनी 12 रोजी काढले. पालिकेचे मुख्याधिकाकारी बी.टी.बाविस्कर सेवानिवृत्त झाल्याने हे पद रिक्त होते तर तात्पुरता पदभार चाळीसगावचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांच्याकडे देण्यात आला होता. पालिकेला पूर्ण वेळ मुख्याधिकारी मिळाल्याने शहरविकासाचे विषय मार्गी लागण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. बुधवारी वा गुरूवारी ते पालिकेचा पदभार घेण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.